ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ज्येष्ठ नागरीक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार’ या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन येथील ज्येष्ठ नागरीक भवन येथे करण्यात आले होते.
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरून व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश के.ए. नहार, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार व प्रमुख मार्गदर्शक म्हणून पॅनल वकील राजेश कोडापे उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी के.ए.नहार यांनी ज्येष्ठ नागरिकांसंबंधी मनोगत व्यक्त केले. यवतमाळातील मनोहर नगर येथील ज्येष्ठ नागरीक मंडळ येथे पूर्वीपासून स्थापन असलेल्या लिगल एड क्लिनिकच्या माध्यमातून दर आठवड्याला रविवारी व बुधवारी मोफत कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन केले जाते. नागरिकांनी कायदेविषयक समस्यांविषयी संपर्क साधण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी ज्येष्ठ नागरीकांना असलेल्या अधिकाराबाबत सांगितले. वृध्दाश्रमात आई-वडीलांना पाठविणे चुकीचे असून ते आपल्या मुलांना लहानापासून ते मोठे होईपर्यंत स्वतः काबाडकष्ट करून घडवितात. मुलांना घडविण्यात आई-वडीलांचा मोलाचा वाटा असतो. अशाच समाजातील शेवटच्या व तळागळातील घटकापर्यंत मोफत व सक्षम विधी सेवा पुरविली जावी हा सर्वोच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरणाचा उद्देशाने या कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वकील तथा ज्येष्ठ नागरीक मंडळाचे सदस्य अरूण मेहत्रे यांनी केले तर उपाध्यक्ष विनोद सहस्त्रबुध्दे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नागरीक मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी