जिप पदभरतीतील तीन पदांची परीक्षा ७ आणि ८ ॲाक्टोबरला

परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध जिल्हा परिषदेच्या गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरतीमधील तीन पदांची परीक्षा ७ आणि ८ ॲाक्टोबर रोजी होणार आहे. यात रिंगमन, वरिष्ठ सहाय्यक लेखा आणि विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदांच्या परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी जिपच्या संकेतस्थळावर ऑनलाईन लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. रिंगमन आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा पदासाठी ७ ॲाक्टोबर रोजी तर विस्तार अधिकारी सांख्यिकी पदासाठी ८ ॲाक्टोबर रोजी आयबीपीएस कंपनीकडून ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. जिपच्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र आणि माहिती पुस्तिका जिल्हा परिषद, यवतमाळच्या www.zpyavatmal.gov.in या अधिकृत लिंकवर उपलब्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी या लिंकवरून परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी