प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे आज उद्घाटन

जिल्ह्यातील वीस ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांना मंजुरी : जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि.19 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील युवक युवतींना कौशल्य प्रदान करण्यासाठी व उद्योजकता निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगार निर्माण होण्यासाठी ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात एकूण 20 ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आह. त्यामध्ये जवळा, लाडखेड, कलगाव, काळी दौलत, शेंबाळपिंपरी, मुळावा, सोनवाढोणा, इंद्रठाणा, तिवसा, हातोला, पाटणबोरी, चिखलगाव, पाटण, मुकुटबण, राणीअमरावती, खापरी, पारवा, जोडमोहा, वेगाव आणि झाडगाव या ठिकाणाचा समावेश आहे. राज्यातील संपूर्ण 511 कौशल्य विकास केंद्राचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कौशल्य विकासाबद्दलचे विचार आपले मांडणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी केंद्राच्या ठिकाणी आयोजित समारंभास जिल्ह्यातील युवक युवतींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी