हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी पिकावरील रोगाचे एकात्मिक नियंत्रण करावे

यवतमाळ, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी पिकावरील रोगाचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी डॅा. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाच्या कीटकशास्त्र विभागाने उपायोजना करण्याचे आवाहन केले आहे. उपाययोजना करतांना मररोग्रस्त शेतात हरभरा पीक घेवू नये, पिकाची फेरपालट करावी. रोग प्रतिबंधक जाती उदा. आयसीसीव्ही १०, विजय, विशाल, जाकी ९२१८ साली ९५१६, पीडीकेव्ही कांचन (ओलीताखाली) या जातीचा पेरणीकरिता वापर करावा. परंतू वाण निवडताना जमिनीचा प्रकार व वाणाची इतर वैशिष्ट्ये लक्षात घेऊन या संदर्भात तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊनच वाण निवडावे. पेरणीपूर्वी बियाण्यास टेबुकोनाझाल ५.४ टक्के एफएस बुरशीनाशक ४ मीली किंवा प्रोक्लोराझ ५.७ टक्के + टेबुकोनाझाल १.४ टक्के ईएस ३ मिली किंवा टेबुकोनाझाल १५ टक्के + झीनेब ५७ टक्के डब्लूडीजी ४० मिली प्रति १० किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. यानंतर बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० किलो या प्रमाणात बिजप्रकिया करावी. जास्त बाधीत क्षेत्रात एकरी २ किलो ट्रायकोडर्मा २०० किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावा, या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी