जवाहर नवोदय विद्यालयात अकरावीसाठी प्रवेशाची विद्यार्थ्यांना संधी

घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या इयत्ता 11 वी तील रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत असून प्रवेश अर्ज ऑनलाईनच मागविण्यात आले आहेत.
इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी प्रवेश पत्रात दिलेल्या परीक्षा केंद्रावर होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नवोदय विद्यालयाच्या www.navodaya.gov.in या वेबसाईटवर तर परीक्षेसाठी लागणारी विस्तारीत माहिती www.navodaya.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आहे. या परीक्षेसाठी लागणाऱ्या पात्रतेनुसार विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 10 वी यवतमाळ जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळेचाच विद्यार्थी असावा. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, असे विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र राहणार नाहीत. यासोबतच विद्यार्थ्याचा जन्म दि. 1 जून 2007 ते 31 जूलै 2009 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ही अट सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागु आहे. जे विद्यार्थी भारतात 10 वी शिकलेले आहे. व भारतीय राष्ट्रीयत्व आहे तेच विद्यार्थी पात्र आहे.याविषयी अधिक माहितीसाठी नवोदय विद्यालयाच्या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य के. डी. धोपटे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी