जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने एमएसएमई उद्योगांकरिता कार्यशाळा

जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील स्थापित तसेच नव्याने येऊ घातलेल्या एमएसएमई उद्योगांकरिता एकदिवसीय ईग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन अमरावती विभागाचे उद्योग सहसंचालक सतिश शेळके यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम व अन्य मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात सतिश शेळके यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उद्योजकांना आपले उत्पादन निर्यात करण्यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच यवतमाळ जिल्ह्यास निर्यातक्षम जिल्हा करण्याकरीता आव्हान केले. विदेश व्यापार महानिदेशालय, नागपूर, सिडबी, ओएनडीसी, क्यूसीआय, निर्यात सल्लागार, डाक विभाग, ॲपेडा मुंबई, भारतीय औद्योगिक विकास बँक, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसीएशन आदींचे अधिकारी, पदाधिकारी यांनी उपस्थित उद्योजकांना यावेळी आयईसी कस्टम प्रक्रिया, एमएसएमई योजना, निर्यात कशी करावी, बायर सेलर मीट, ईपीसीची भूमिका, वित्तीय सहाय्य मिळविण्याचे पर्याय, ई-कॉमर्स आदींबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील उद्योजक, औद्योगिक संघटना, एफपीओ, उद्यमशील युवक-युवती, क्लस्टर सदस्य, सध्या कार्यरत निर्यातदार असे एकूण ३०० हून अधिक औद्योगिक क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी नवउद्योजकांचे १० स्टॉल लावण्यात आले होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी