स्वच्छता ही सेवा उपक्रमात पालकमंत्री, खासदारांचे श्रमदान

उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग ; यवतमाळ नगरपरिषदेचा ‘एक तारीख, एक तास’ उपक्रम देशभरात 'स्वच्छता ही सेवा' ही मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत यवतमाळ नगर परिषदेच्यावतीने आयोजित स्वच्छतेसाठी ‘एक तारीख-एक तास’ या उपक्रमात पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांनी सहभागी होत श्रमदान केले.
शहरातील समता मैदानात आयोजित या उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर, तहसीलदार योगेश देशमुख, राजेंद्र डांगे, उध्दवराव साबळे, नितीन गीरी, पिंटु बांगर, राजु पडगीलवार आदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विशेष स्वच्छता मित्र म्हणून कमलेश ईटकरे, जयश्री ब्राम्हणे, रंजिता चंदेल, चंदा राऊत, आनंद चौधरी यांचा पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात कामगारांना भेटवस्तू देणाऱ्या दालमिया सिमेंटचे यवतमाळ येथील प्रबंधक कटारीया यांचाही सन्मान करण्यात आला. या श्रमदान मोहिमेत निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.दिनेश चांडक, डॉ.विजय अग्रवाल, नेहरु युवा केंद्र, प्रयास, टीडब्ल्युजे या संस्थासह नगर परिषदेचे शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, कंत्राटी कामगार, स्वच्छता मित्र आदींनी सहभाग घेतला होता.
प्रत्येकाने स्वच्छतेच्या मुलमंत्राचा अंगिकार करावा- खा.भावना गवळी समाजातील प्रत्येकाने स्वतःला नियमबध्द करुन महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या मुलमंत्राचा अंगिकार केला पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीत आपण जो दुर्लक्षितपणा करतो तोच आपल्या आणि समाजाच्या अंगलट येते. सर्व काही पालिका करेल ही विसंबून राहण्याची सवय आता सोडली पाहिजे, असे यावेळी खासदार भावना गवळी यांनी सांगितले. यवतमाळकरांच्या प्रतिसादामुळे नपचे काम प्रशंसनीय- डॉ.आशिया केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन आणि राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत पालिकेच्या उपक्रमांना यवतमाळकर नागरिक व शहरातील संस्था, संघटनांनी मौलिक प्रतिसाद दिल्यामुळे यवतमाळ नगरपालिकेने अनेक प्रशंसनीय कामे केली आहेत. यापुढेही सर्वांनी प्रशासनाला असेच सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी