तुतीसाठी 3.97 लाखांचे अनुदान ; अर्ज केला ना ?

जिल्हयातील शेतकऱ्यांकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी जवळपास 2 लाख 18 हजार रुपये तर संगोपनगृह बांधकामासाठी 1 लाख 79 हजार रुपये असे तीन वर्षासाठी जवळपास 3 लाख 97 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
2.18 लाख अनुदान महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत तुती लागवड 682 मनुष्य दिवस, मजुरी दर 273 रुपये, अकुशलसाठी 1 लक्ष 86 हजार 186 रुपये तर कुशलसाठी 32 हजार रुपये असे एकुण 2 लाख 18 हजार 186 रुपये अनुदान आहे. बांधकामासाठी अनुदान कीटक संगोपनगृह बांधकामासाठी मनुष्य दिवस 213, मजुरी दर 273 रुपये अकुशलसाठी 58 हजार 189 रुपये आणी कुशलसाठी 1 लक्ष 79 हजार 149 रुपये अनुदान मिळणार आहे. कीटक संगोपनगृह बांधकाम 50 बाय 22 प्रमाणे 1100 वर्ग फूट बांधकाम तुतीच्या बागेजवळ करणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे करावा ? ज्या शेतकऱ्यांकडे बारमाही सिंचनाची सोय आहे. अशा शेतकऱ्यांनी सोयाबीननंतर लागवड करण्यासाठी अर्ज ग्रामपंचायत, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा रेशीम कार्यालय, यवतमाळ येथे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अटी काय ? या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अल्पभूधारक असावा, लाभार्थी मनरेगा जॉब कार्ड बँक खात्याला संलग्न केलेले असावे, बैंक खाते पासबुक झेरॉक्स आणि सिंचनाची सोय असल्याचा दाखला किंवा सातबारावर विहिरीची नोंद असणे आवश्यक आहे. सिल्क समग्र - योजना रेशीम संचालनालयाच्या वतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समर्ग -2 ही योजना सुद्धा राबविण्यात येत आहे. या योजनेतुन तुती लागवड, कीटक संगोपनगृह बांधकाम, कीटक संगोपन साहित्य, तुती रोप वाटिका, बाल कीटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासुन धागा तयार करण्यासाठी मल्टिएंड रिलींग मशीन करीता सर्वसाधारण वर्गासाठी 75 टक्के अनुदान आणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 90 टक्के अनुदान देण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी