इट राईट मिलेट मेळाव्याचे आयोजन ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

शहरात अन्न व औषध प्रशासन विभाग व माहेश्वरी मंडळ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्याचा आपल्या आहारात समावेश करण्याबाबत जनजागृतीसाठी महेश भवन, यवतमाळ येथे इट राईट मिलेट मेळावा नुकताच संपन्न झाला. नागरिकांनी या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत मिलेट्स रेसीपी व इतर पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेतला.
या मेळाव्याचे उद्घाटन श्यामसुंदर काबरा यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ जयश्री उघाडे, माहेश्वरी मंडळाचे चंद्रकांत बागडी, विजय लाहोटी, शोभा मुंधळा उपस्थित होत्या. यावेळी डॉ जयश्री उघाडे यांनी जंक फूडचे दुष्परिणाम, मिलेट्सचा आहारातील महत्त्व सांगितले व विविध शंकांचे निरसन केले. सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामासह सकस व पोषण मुल्यांनी युक्त असे आहार घेणे आवश्यक आहे. भरड धान्य हे भारतीय अन्न संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेवून दैनंदिन आहारात तृणधान्याचा वापर करणे आजच्या फास्टफुडच्या काळात गरजेचे बनले आहे. भगर, नाचणी, राजगिरा, कुट्टु, बाजरी, ज्वारी, कोदो, कुटकी, कांगनी, सावा इत्यादी भरडधान्यांमध्ये ग्लुटेनचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे शरीरातल्या शुगर, कोलेस्टेरॉलच्या समस्या दुर होतात व ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मधुमेहच्या रुग्णांनी आहारात मिलेट्सचा समावेश केल्यास शुगर नियंत्रणात राहते. भरड धान्य हे कॅल्श‍ियम, आयर्न, फायबर व विटॅमीन्सने समृध्द असतात. कॅल्श‍ियममुळे हाडे मजबुत होतात, फायबरमुळे पाचन होण्यास मदत होते, आयर्नची भरपुर मात्रा असल्याने रक्त शुध्द होते व ते महिलांसाठी सुपर फुड म्हणून काम करते, असे मत अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे यांनी प्रास्ताविकात मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी घनश्याम दंदे, अमित उपलप व माहेश्वरी मंडळाचे महेश मुंदडा, अॅड वरुण भुतडा यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी