ग्रंथालयाचे सभासद होण्याचे आवाहन -जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन

यवतमाळ दि. 13 (जिमाका) -माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा दि. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करण्यात येतो. या दिना निमित्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे वाचन प्रेमी साठी नविन सभासदत्व देण्यात येणार आहे. ग्रंथालयामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेतील एकूण 1 लाख 17 हजार 197 एवढी ग्रंथ संपदा असून कोणीही नागरिक सभासदत्व स्वीकारू शकता. सभासदत्व स्वीकारण्यासाठी फक्त रु. 100 एवढीच वर्गणी दोन वर्षासाठी घेण्यात येते. तसेच अनामत रक्कम रु. 500 म्हणून घेण्यात येते. आपण सभासदत्व रद्द केल्यास आपली अनामत रक्कम आपणास परत करण्यात येते. रु.100 च्या द्वै-वार्षिक वर्गणीमध्ये या ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथ संपदेतील ग्रंथ आपण घरी वाचावयास नेवू शकतात. ग्रंथालयाचे सभासदत्व स्वीकारायचे असल्यास अर्ज विक्री सुरु झाली असून अर्जाची किंमत रु.१० आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी व अर्ज जमा करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, तहसिल चौक, यवतमाळ, या ग्रंथालयात सकाळी 10.30 ते सायं 5.30 या वेळेत संपर्क साधावा. (शासकीय सुट्टीच्या दिवशी ग्रंथालय बंद असेल.) तरी वाचनप्रेमी, विद्यार्थी, संशोधक, अभ्यासकयांनी याची नोंद घेवून, या ग्रंथालयाचे सभासद व्हावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कविता महाजन यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी