आर्णी येथे आरोग्य शिबिरात १५९ जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

जागतिक जेष्ठ नागरिक दिन : जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि संत श्री दोला महाराज वृध्दाश्रम उमरी पठार ता. आर्णी यांच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५९ जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ८६ महिला व ७३ पुरुष सहभागी झाले होते.
या आरोग्य शिबीराचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष द. तु. नंदापुरे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया उपस्थित होते. या कार्यक्रमाला समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, गोपाल कोठारी, हरिओमबाबू भूत, मंजूदेवी भूत, अॅड चौधरी, अपर्णा नंदापुरे, रमेश कोष्टावार, राहुल पोडुटवार, मनिष गावंडे, शंकर मिर्झापूरे, सरपंच शंकर तलमले, सचिन पवार, पोलिस पाटील विलास मिर्झापूरे, संस्थेचे पदाधिकारी मधुकर रत्ने, दिवाकर ब्राम्हणक, सुरेश तलमले, वृध्दाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे, कर्मचारी राजू जयस्वाल तसेच ग्रामवासी व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त चव्हाण यांनी जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत विचारपूस केली आणि त्यांना फळ व अल्पोपहाराचे वाटप केले. आरोग्य शिबीरामध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जेष्ठ नागरिकांना औषधोपचार उपलब्ध करुन दिले. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी ता. आर्णी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश उके यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शेषराव डोंगरे यांनी शिबिराचे आयोजन व वृध्दाश्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन कराळे यांनी तर कनिष्ठ लिपीक श्याम लांडोळे यांनी आभार मानले. “जेष्ठ नागरिकांनी शासकीय योजनांचे लाभ घ्यावे. आरोग्य शिबिरामध्ये सर्व जेष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच वृध्दाश्रमास येणाऱ्या अडीअडचणींबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल”, असे मत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी