विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळणार

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत शिबीर : महागाव, दारव्हा, वणी आणि पुसद उपविभागात शिबिराचे आयोजन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत महागाव, दारव्हा, वणी आणि पुसद या उपविभागात शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. या शिबिरात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात बारावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पात्र अर्जदार विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न समिती करणार आहे.
दि. 12 ऑक्टोबर रोजी महागाव आणि उमरखेड तालुक्यासाठी मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महागाव येथे शिबीर होणार आहे. दि.19 ऑक्टोबर रोजी दिग्रस, नेर आणि दारव्हा तालुक्यासाठी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, दारव्हा येथे शिबीर होईल. मारेगाव आणि वणी तालुक्यासाठी दि. 26 ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे शिबीर होईल. पुसद आणि दिग्रस तालुक्यासाठी दि. 2 नोव्हेंबर रोजी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या ठिकाणी बारावी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेला अर्ज सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत सादर करावा. या शिबिरात जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सन 2023-24 मधील 12 विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी बार्टीच्या https://bartievalidity.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करुन परिपूर्ण भरलेला अर्ज व मुळ कागदपत्रासह उपस्थ‍ित राहावे. अर्जदाराचा जातीचा दाखला यवतमाळ जिल्ह्यातील असावा. अर्जदार हा अनुसूचित जाती (एसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागासवर्ग (एसबीसी) व इतर मागासप्रवर्ग (ओबीसी) याच प्रवर्गाचे अर्ज समितीकडून स्वीकारले जातील व त्यांची पडताळणी केली जाईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेशी संपर्क करावा. ज्या विद्यार्थीचे अर्ज परिपूर्ण असतील त्या विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून देण्याचा मानस समितीचा आहे. परिपूर्ण अर्जासाठी आवश्यक असलेले कागदपत्र व पुराव्याच्या यादीसाठी जिल्हा प्रशासनाच्या https://yavatmal.gov.in/notice_category/announcements/ या संकेतस्थळावर भेट देवून त्यानुसार कागदपत्रे सादर करावी. यवतमाळ जिल्ह्यातील एकही विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून वंचित राहू नये हा या शिबीराचा मुळ उद्देश आहे. ही शिबिरे प्रत्येक उपविभागात एक याप्रमाणे आयोजित केलेली असून या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळद्वारे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी