आदिवासी भागात सांस्कृतिक संकुल बांधण्यासाठी योजना ; प्रस्ताव 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, उमरखेड व नेर या सात तालुक्यातील चालु आर्थिक वर्षात आदिवासी भागामध्ये सांस्कृतिक संकुल बांधणे हीयोजना राबविण्यात येत आहे.चालु आर्थिक वर्षाकरीता सांस्कृतिक संकुल योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींकडुन परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, उपजिल्हा रुग्णालयजवळ, संत सेवालाल चौक, पुसद येथे दि. 31 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. 
या योजनेच्या निकषानुसार सांस्कृतिक भवन,सांस्कृतिक संकुल बांधकामासाठी जमीन विनामुल्य असणे आवश्यक आहे. जमीन विनामुल्य उपलब्ध असल्याचे ग्रामपंचायत व नगरपालिका यांचा ठराव आवश्यक आहे. जागेचा मुळ सातबाराव उतारा (अलिकडील प्रत), जागेचा मोजणी नकाशा (अलिकडील प्रत) ज्याठिकाणी संकुल मंजूर करावयाचे आहे तेथील आदिवासी लोकसंख्या तसेच त्या परिसरातील किती गावांना, लोकसंख्येला आदिवासी योजनेचा लाभ होणार आहे याचा सांख्यिकी तपशिल, सांस्कृतिक संकुल, भवन बांधकामाच्या जमीनीवर अतिक्रमण अथवा न्यायालयात दावा दाखल नसल्याबाबतचा दाखला देणे आवश्यक आहे. बांधकाम क्षेत्रफळ कमीत कमी 437 चौरस मीटर असावे, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी