जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएस पोर्टलवरच करावी - जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया

जिल्हा समन्वय समितीची सभा ; बाळाच्या नावानिशी जन्म प्रमाणपत्रासाठी नोंदणीचे आवाहन ; जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जन्म-मृत्यू घटनेची नोंदणी ही नागरी नोंदणी पद्धती अर्थात सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टीम (सीआरएस) पोर्टलवरच करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी नागरिकांसह पंचायत समितीच्या सर्व गट विकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
नागरी नोंदणी पद्धतीअंतर्गत जन्म-मृत्यू नोंदणीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या सभेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर राठोड, इंडियन मेडीकल असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष डॅा. स्नेहा भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू) डॉ. पी. सी. चव्हाण, सांख्यिकी अधिकारी सी. जी. जाधव, माहिती अधिकारी पवन राठोड, महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. देशभरात जानेवारी 2016 पासून जन्म-मृत्यू घटनांची नोंदणी ही केंद्र शासनाच्या सीआरएस पोर्टलवर सुरु करण्यात आलेली आहे. परंतु शहरी भागातील नगरपरिषद, पंचायत व शासकीय आरोग्य संस्था वगळता, सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, जन्म-मृत्यू नोंदणी केंद्र, महसुली गावांमधून सीआरएस पोर्टलवर नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी यापुढे शंभर टक्के ग्रामपंचायत, महसुली गावातील जन्म-मृत्यू नोंदणी केंद्रातून, जन्म-मृत्यू घटनेची नोंदणी, फक्त सीआरएस पोर्टलवरच करण्यात यावी. जेणेकरून मयत व्यक्तीच्या नावावरील विम्याचा दावा, बँक खात्यावरील रक्कम व शासकीय योजनेअंतर्गत देय असलेले लाभ मिळण्यास वारसांना अडचण येणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या.
केंद्र शासनाचा जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व महाराष्ट्र राज्य जन्म-मृत्यू नोंदणी नियम 2000 नुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात जन्म-मृत्यूच्या घटनांची नोंदणी होत असते. जिल्ह्यात शहरी भागातील 17 नगरपरिषद व पंचायत, 16 शासकीय आरोग्य संस्था आणि ग्रामीण भागातील 1801 नोंदणी केंद्र, 69 शासकीय आरोग्य संस्था याप्रमाणे एकूण 1903 नोंदणी केंद्रामार्फत जन्म-मृत्यू घटनांची नोंदणी करण्यात येते. जन्म-मृत्यू घटनांची नोंदणी घटना घडल्यापासून विहीत मुदतीत म्हणजे 21 दिवसात आवश्यक माहिती प्राप्त झाल्यावर संबंधित निबंधक विनामूल्य करतात. परंतु विहित कालावधीत नोंदणी न केल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी विहित मुदतीतच घटनेची माहिती संबंधित निबंधकास देवून जन्म-मृत्यू, घटनेची नोंद वेळत करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून विनाकारण पैसे व वेळ दोन्हीही खर्च होणार नाहीत. या कायद्यानुसार घटना ज्या निबंधकाच्या कार्यक्षेत्रात घडली. त्याच निबंधकाकडे नोंद होत करावी. जुन्या ज्या नोंदीत बाळाचे नाव न टाकता जन्म नोंदणी केलेली आहे. अशा नोंदणीबाबत आता बाळाचे नाव नोंदवून बाळाच्या नावानिशी प्रमाणपत्र देण्याची मुदत शासनाने दि. 27 एप्रिल 2026 पर्यंत वाढवून दिलेली आहे. ज्या नागरिकांनी पूर्वी बाळाचे नाव न टाकता जन्म नोंदणी करून बाळाचे जन्म प्रमाणपत्र घेतलेले आहे. त्यांनी लवकरात लवकर बाळाचे नाव टाकून प्रमाणपत्र घेऊन जावे, असे आव्हान करण्यात आले आहे. तसेच मुदतीनंतर जुन्या नोंदीमध्ये बाळाचे नाव टाकून बाळाच्या नावानिशी प्रमाणपत्र देण्याची मुदत वाढवली जाणार नाही, असेही सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी