बाभुळगाव येथे अमृत कलश यात्रा व स्वच्छता ही सेवा कार्यक्रम

आमदार डॉ.अशोक उईके यांची उपस्थिती ; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत बाभुळगाव तालुकास्तरीय अमृत कलश यात्रा व स्वच्छता ही सेवा पंधरवाडा कार्यक्रम दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान उमरी स्मारक या ठिकाणी ग्रामपंचायत उमरी व पंचायत समिती बाभूळगाव यांचा संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
हा कार्यक्रम आमदार डॉ. प्रा.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली तथा मार्गदर्शनाखाली तसेच बाभुळगाव तहसीलदार मिराताई पागोरे व गटविकास अधिकारी रविकांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमावेळी वीरपत्नी श्रीमती घोटेकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत उमरीच्या सरपंच सोनाली शेळके, पोलिस पाटील शुद्धोधन ढेपे, उपसरपंच मंदाताई गोटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी केले. सूत्रसंचलन स्मिता गोलर यांनी केले तर विस्तार अधिकारी अविनाश पोपळकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाकरिता बाभुळगाव गटशिक्षणाधिकारी गणेश मैघणे, कृषी अधिकारी अंबरकर, विस्तार अधिकारी मंगेश देशपांडे, कृषी विस्तार अधिकारी चंद्रशेखर हेडावू, व्ही.एम.कोडापे, केंद्रप्रमुख विलास काळे, प्यारेलाल वानखडे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, सतिषणी मालनवार, नितीन परडखे, अनिकेत पोहकर, सचिव कुमरे, उमरी शाळेचे मुख्याध्यापक पारधी, माजी समाज कल्याण सभापती प्रज्ञाताई भुमकाळे तसेच स्वामी विवेकानंद हायस्कूल चिमनापूर व पीएनबी शाळा बाभुळगाव येथील शिक्षक व विद्यार्थी तसेच पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी