Posts

Showing posts from September, 2025

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
यवतमाळ, दि. १३ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात १ लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, महसूल मं...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यवतमाळ येथे आगमन

Image
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यवतमाळ येथे आगमन* यवतमाळ, दि. १३ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी विकास मीना व विविध मान्यवरांनी स्वागत केले. पुढील कार्यक्रमासाठी रवाना. ०००

मोरारी बापू यांची राम कथा सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
यवतमाळ, दि. १३ : मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेले आहे. पिढ्यानपिढ्या आपण राम कथा ऐकत आलेलो आहोत, मात्र मोरारी बापू यांच्या वाणीतून राम कथा ऐकणे, हे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मोरारी बापू यांच्या राम कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार संजय देशमुख, बळवंत वानखेडे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, किशोर जोरगेवार, राजू तोडसाम, ॲड आशिष देशमुख, किसनराव वानखेडे, सईताई डहाके, रामकथाचे आयोजक डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राम कथा ही सर्वात सुंदर कथा आहे. त्यामुळे ही राम कथा ऐकणे म्हणजे जीवनाचा मार्ग प्रशस्त करणे आहे. राम कथेमध्ये संपूर्ण जीवनाची सुंदर शिकवण आहे. मोरारी बापू यांच्याकडून अर्थपूर्ण राम कथा ऐकायला मिळणे हे प्रत्येकासाठी सौभाग्याचा क्षण आह...