लाडक्या बहिणींना निधी वितरणाचा आज शुभारंभ

Ø जिल्हा परिषद सभागृहात कार्यक्रम Ø 400 महिला उपस्थित राहणार Ø पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रातिनिधीक वितरण यवतमाळ, 16 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात अर्थसहाय्य वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या दि.17 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 12.30 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात काही महिलांना पालकमंत्र्यांच्याहस्ते धनादेश वितरीत करण्यात येतील. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात निधी वितरण यापुर्वीच सुरु झाले आहे. उद्या वितरणाचा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पुणे येथून होत आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या जिल्हाभरातील 400 महिला या कार्यक्रमास उपस्थित राहतील. पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरूप 10 ते 15 महिलांना अर्थसहाय्याच्या धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल