नामांकित निवासी शाळेसाठी 30 जून पर्यंत अर्ज आमंत्रित
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा कार्यक्षेत्रातील सन 2024-25 या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी दि.30 जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव झरी, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, यवतमाळ हे तालुके येत असुन या तालुक्यातील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. इयत्ता 1 ली 2 री मध्ये प्रवेश देण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीच्या दाखला, आधारकार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकाच्या कुटूंबातील वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रुपये 1 लाख आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 6 वर्ष पुर्ण असावे. विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येतील. तसे प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत जोडावे लागेल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येतील. निवड केलेल्या विद्यार्थ्यांला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थित पालकाच्या व पाल्याच्या विनंती नुसार शाळा बदलता येणार नाही.
अर्जासोबत विद्यार्थ्यांचे दोन पासपोर्ट साईज फोटो. पालकाचे रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र. उत्पन्नाचा दाखला. अंगणवाडीचा दाखला (पहिल्या इयत्तेसाठी) ग्रामसेवकाचा दाखला. दारिद्रयरेषेखाली असल्याबाबतचा दाखला, ग्रामसेवकाचा दाखला. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड. महिला पालक विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र. हमी पत्र इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
नामांकीत शाळा प्रवेश अर्ज या कार्यालयांतर्गत कार्यरत नामांकीत, शासकीय, अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांकडे व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा या कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. आवश्यक कागदपत्रासह अचूक माहिती भरुन अर्ज दि. 30 जून पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा येथे सादर करावे, असे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी कळविले आहे.
000
Comments
Post a Comment