मुलांचे शासकीय वसतीगृह नेर येथे मोफत प्रवेश प्रक्रीया सुरु

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या मुलांचे शासकीय वसतीगृह नेर नबाबपूर येथे रिक्त जागेवर प्रवेश देण्यासाठी वर्ग 8 वी, 11 वी व बिए, बिकॉम, बिएस्सी प्रथम वर्षाकरिता प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे. अनुसुचीत जातीसाठी 80 टक्के, अनुसूचीत जमाती 3 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी 5 टक्के, इतर मागासवर्ग 5 टक्के, विशेष मागासप्रवर्गासाठी 3 टक्के, अनाथ 2 टक्के व अपंगासाठी 3 टक्के जागा राखीव आहे. प्रवेश घेण्यासाठी मागील शैक्षणिक सत्रातील गुण पत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वसतीगृहाचे गृहपाल दिपक धावडे यांच्याशी 9823723802 या क्रमांकावर संपर्क साधावा असे वसतीगृहाच्या गृहपालांनी कळविले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल