Posts

Showing posts from October, 2025

कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतक-यांना प्रशिक्षण

Image
यवतमाळ, दि.31 (जिमाका) : भारतीय कृषि अनुसंधान परिषदेअंतर्गत नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था, व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑक्टोबर रोजी माळवणी, कळंब येथे अति सघन कापूस लागवड प्रकल्पा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दीपक कछवे होते. विशेषज्ञ किटकशास्त्र कृषि विज्ञान केद्र डॉ.प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ अभियांत्रिकी राहुल चव्हाण, सरपंच दिपाली जामुलकर, सुदर्शन पतंगे,शिवानी बावनकर, रविंद्र राठोड, गौरव येलकर, नयन ठाकरे, अमोल वाळके उपस्थित होते. विदर्भातील पिक कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव,पांढरकवडा, वणी, मारेगाव, घाटंजी, आर्णी तालुक्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषि विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाच्यादृष्टीने शेतकरी प्रशिक्षण प्रकल्प राबविला जात आहे. कार्...

जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

Image
यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्तआणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या, तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी, तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. 0000000

सरदार@१५० पदयात्रेला युवकांचा मोठा प्रतिसाद > जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत युवकांनी > घेतली राष्ट्रीय एकतेची शपथ

Image
यवतमाळ, दि. ३१ (जिमाका) : मेरा युवा भारत केंद्र व युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंतीनिमित्त सरदार@150 एकता पदयात्रा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज काढण्यात आली. शाळा- महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह युवक, नागरिकांचा पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी विकास मीना व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अमोलकचंद महाविद्यालय येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी श्री. मीना व पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पदयात्रेस हिरवी झेंडी दाखवून पदयात्रा मार्गस्थ केली. क्रांतिताई राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र भांडवलकर, एनसीसी कर्नल अनुप नायर, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम अनिल ढेंगे, सुरज गुप्ता, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तसेच विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ आणि पोलीस अधीक्षक यांनी सर्वांना नशामुक्तीची शपथ दिली. जितेंद्र सातपुते यांनी सर्वांना आत्मनिर्भर...

‘मनरेगा’ मजुरांसाठी फेस ई-केवायसी अनिवार्य ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करा: प्रशासनाचे आवाहन

यवतमाळ,दि.29(जिमाका):महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांसाठी फेस ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे प्रत्येक मजुराची ओळख मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रमाणित करण्यात येणार असून, ग्राम रोजगार सहाय्यक यांच्या मदतीने ही प्रक्रिया संबंधित मजुरांना आपल्या गावातच पूर्ण करता येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या प्रक्रियेसाठी ग्राम रोजगार सहाय्यकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व मजुरांनी आपली फेस ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या एकूण ४ लक्ष २३ हजार ९७६ सक्रिय मजुरांपैकी १ लक्ष २१ हजार ४० मजुरांची फेस ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित मजुरांनी तातडीने आपल्या ग्राम रोजगार सहाय्यक व तांत्रिक सहाय्यकांशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.फेस ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच मजुरांची माहिती नरेगा संकेतस्थळावर नोंदविली जाईल. यामुळे ज्यांची फेस ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यांच्या उपस्थितीची नोंद होणार नाही आण...

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी 4 नोव्हेंबरला काम वाटप सभा

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी 4 नोव्हेंबरला काम वाटप सभा यवतमाळ, दि. 30 (जिमाका) : सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ यांच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी काम वाटप सभा दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या सभागृहात होणार आहे. या सभेसाठी सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आपले ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता यांच्याकडून करण्यात आले आहे. 00000

सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाबाबत कर्मचा-यांना प्रशिक्षण

सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाबाबत कर्मचा-यांना प्रशिक्षण यवतमाळ, दि. 30 (जिमाका) : केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण प्रकल्प अंतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. यवतमाळच्या सभागृहात कर्मचा-यांना बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरिक्षक, तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, तालुका लेखापरिक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नोडल अधिकारी तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे सचिव उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये नाबार्डमधील पीडब्ल्यूसीचे निखिल सावरकर आणि प्रथमेश देसाई यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे संस्थांच्या संगणकीकरणासाठी उपलब्ध सॉफ्टवेअर व त्यामधील २२ प्रकारचे मॉड्युल्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या सॉफ्टवेअरचा वापर संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी कसा करावा आणि संगणकीकरणाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना कशा कराव्यात, याबाबत माहिती दिली. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण हा केंद्रीय सहकार विभागाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रक...

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत यवतमाळ, दि.30 (जिमाका) : राष्ट्रीय व राज्य विधीसेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनात दि.13 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित व दाखलपुर्व जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे येथे होणार आहे. तज्ज्ञांची मदत मिळेल या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भू-अर्जन मामले, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व ...