सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाबाबत कर्मचा-यांना प्रशिक्षण

सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाबाबत कर्मचा-यांना प्रशिक्षण यवतमाळ, दि. 30 (जिमाका) : केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण प्रकल्प अंतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. यवतमाळच्या सभागृहात कर्मचा-यांना बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरिक्षक, तालुका उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, तालुका लेखापरिक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नोडल अधिकारी तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे सचिव उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये नाबार्डमधील पीडब्ल्यूसीचे निखिल सावरकर आणि प्रथमेश देसाई यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे संस्थांच्या संगणकीकरणासाठी उपलब्ध सॉफ्टवेअर व त्यामधील २२ प्रकारचे मॉड्युल्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या सॉफ्टवेअरचा वापर संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी कसा करावा आणि संगणकीकरणाच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना कशा कराव्यात, याबाबत माहिती दिली. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण हा केंद्रीय सहकार विभागाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामुळे संस्थांचे कामकाज अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान होणार आहे. शासनाच्या विविध योजना राबविण्यास सुलभता येईल आणि संस्थेच्या सभासदांमध्ये विश्वासार्हता वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेवर व सुलभपणे उपलब्ध होईल, असे प्रतिपादन उपनिबंधक से.नि. प्रदिप बर्गे यांनी आपल्या भाषणात केले. या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा विशेष लेखापरिक्षक श्रीनिवास पांढरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण दुधे, बँक नोडल अधिकारी निलेश देशमुख, नाबार्ड इंटर्न शुभम काळकर, तसेच सर्व तालुका सहाय्यक निबंधक, सहकार अधिकारी, तालुका लेखापरिक्षक आणि प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्थांचे शाखा सचिव उपस्थित होते. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस