सरदार@१५० पदयात्रेला युवकांचा मोठा प्रतिसाद > जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत युवकांनी > घेतली राष्ट्रीय एकतेची शपथ

यवतमाळ, दि. ३१ (जिमाका) : मेरा युवा भारत केंद्र व युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंतीनिमित्त सरदार@150 एकता पदयात्रा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज काढण्यात आली. शाळा- महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह युवक, नागरिकांचा पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी विकास मीना व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अमोलकचंद महाविद्यालय येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी श्री. मीना व पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पदयात्रेस हिरवी झेंडी दाखवून पदयात्रा मार्गस्थ केली. क्रांतिताई राऊत, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र भांडवलकर, एनसीसी कर्नल अनुप नायर, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम अनिल ढेंगे, सुरज गुप्ता, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तसेच विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ आणि पोलीस अधीक्षक यांनी सर्वांना नशामुक्तीची शपथ दिली. जितेंद्र सातपुते यांनी सर्वांना आत्मनिर्भर भारत संकल्प दिला. पदयात्रा अमोलकचंद महाविद्यालय ते जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ते जाजू चौक ते दत्त चौक ते माईंदे चौक ते ॲगलो हिंदी स्कूल चौक ते परत अमोलकचंद महाविद्यालय येथे आली. जिल्हा पोलीस प्रशासन, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी यवतमाळमधील शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मीना व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेरा युवा भारतचे श्री अनिल ढेंगे यांनी केले. त्यानंतर क्रांतिताई राऊत व डी. ए. देवकते यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विकसित भारत या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी युवक व महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनायक अणे विद्यालय, अमोलकचंद महाविद्यालय, दाते कॉलेज, अँग्लो हिंदी शाळा, जे. डी इंग्लिश स्कूल, श्री साई विद्यालय, अभ्यंकर कन्या शाळा, एम. बी. खान ज्युनियर कॉलेज, जाजू कॉलेज, राणी लक्ष्मीबाई शाळा, नाथार स्कूल, एन. सी. सी. युनिट,राष्ट्रीय सेवा, योद्धा अकादमी, आदिना संस्था, पोलीस विभाग, क्रीडा विभाग,क्रीडा संघटना यवतमाळ जिल्हा अथेलेटिस्क, बॉल बॅडमिंटन, फ्लोअरबॉल, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना आदी सहभागी होते. प्रा डॉ. अमोल देशमुख, प्रा पेमेंद्र रामपूरकर, क्रीडा शिक्षक जितेंद्र सातपुते, अजय मिरकुटे, सचिन भेंडे, संजय पंदिरवाड, संजय बट्टावार, संजय दंडे, पियुष भुरचंडी, सागर कुणकर, अमित तिखीले, मुकुंद हमंद. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सतीश मुस्कुंदे आदी उपस्थित होते. अनिल ढेंगे, सारंग मेश्राम यांनी परिश्रम घेतले. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस