जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन
यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्तआणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या, तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी, तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
0000000


Comments
Post a Comment