विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक यवतमाळ, दि. 23 : अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते. यावेळी पियुषसिंह म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत ॲक्शन प्लॅन तयार झाला आहे. त्यामुळे काम त्वरीत सुरू करा. शेततळ्यांची संपूर्ण कामे मार्च 2018 अखेरपर्यंत करण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे. जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात प्रत्येक यंत्रणेला दिलेली कामे त्वरीत सुरू करावी. धडक सिंचन योजनेचा लाभ देण्यात येणा-या लाभार्थ्यांना अग्रीम रक्कम अदा झाली असल्यास त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश द्यावे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सातत्य ठेवा. गुड मॉर्निंग आणि मॉनेटरींग पथकाचा आढावा नियमित घ्या. बोंडअळीच्या प्रादुर्भावासंदर्भात ज्या शेतक-यांच्या तक्रारी आल्या असतील, त्यांचे सर्व्हेक्षण त्वरीत करा. बेंबळा प्रकल्पांतर्गत पूनर्वसनासाठी निधी मंजूर झाला आहे. मार्च 2018 पर्यंत...