सर्वोत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट निर्यात पुरस्कार दिले जातात. सन 2022-2023 व सन 2023-2024 या वर्षांच्या निर्यात पुरस्कारासाठी निर्यातभिमूक उद्योग घटक, व्यापारी निर्यातदार अशा विविध क्षेत्रातील निर्यातदारांकडून सर्वोत्कृष्ट निर्यात पुरस्कार व गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. निर्यात घटकांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रीकल्स उत्पादने, बेसिक केमीकल्स, फार्मास्युटिकल्स आणि कॉस्मेटिक उत्पादने, प्लॉस्टीक आणि लिनोलियम उत्पादने, चामड्याच्या वस्तू, ताज्या भाज्या व फळे, प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ तथा इतर कृषि उत्पादने, सागरी उत्पादने, तयार कपडे, हस्तकला, रत्ने व दागिणे आदींचा समावेश आहे. विविध प्रकारचे 36 राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार दिले जाणार आहे. त्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या घटकांसाठी 11 पुरस्कार, लघु उद्योग घटक 14 पुरस्कार, व्यापारी निर्यातदार 1 पुरस्कार, निर्यातगृह 1 पुरस्कार, ट्रेड हाऊस 1 पुरस्कार, एसएसआय युनिटसाठी प्रादेशिक 6 पुरस्कार, राज्य सरकार महामंडळ 1 पुरस्कार, सेवा निर्यातदार 1 पुरस्कार असे एकुण 36 निर्यात पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारासाठी अर्ज करण्याकरीता उद्योग घटकांची मागील दोन वर्षाची निर्यात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावी. उद्योग घटकांकडे संबंधित प्राधिकरणाची सही असलेला मेमोरँडम असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज, उद्योजकाने मेमोरँडम दाखल केल्याची पावती, सीए सर्टिफिकेट मागील दोन वर्षाचे निर्यातीचे म्हणजे पुरस्कार वर्ष अधिक मागील दोन वर्ष, आरसीएमसी नोंदणी, निर्यात संहिता क्रमांक देश निहाय निर्यात, निर्यात तपशिलसह सुची, ज्या निर्यातदाराने यापूर्वी अर्ज केला आहे, त्यांनी त्यानंतरच्या वर्षासाठी सुधारीत आकडे आणि चालू वर्षासाठी अर्ज सादर करावा. अर्ज दि. 19 जून रोजी किंवा त्यापूर्वी जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ येथे सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमूना व पात्रता कागदपत्रांचे नमुने उद्योग संचालनालयाच्या di.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी व्यवस्थापक नंदकुमार इंगळे 8999433768 यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी कळविले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद