आंतरराष्ट्रीय बाल मजूरी विरोधी दिनानिमित्त जनजागृती अभियान

दिनांक 12 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल मजूरी विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगात पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्यावतीने बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान व सप्ताह जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध व्यापारी संघटना, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांमध्ये जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल, व्यापारी संस्था व ईतर सर्व आस्थापनांच्या व्यापाऱ्यांमध्ये बालकामगार या अनिष्ट प्रथेविरुध्द जागृती करण्यात येणार आहे तसेच त्यांना बाल मजुरी निर्मुलनाचे महत्व समजावून सांगून जनजागृती करण्यात येईल. आमच्याकडे बालकामगार काम करीत नाहीत व यापुढेही बालकामगार ठेवणार नाही, असे हमीपत्र व्यापारी वर्गाकडून भरुन घेण्यात येईल. लहान वयात काम केल्यामुळे बालकांची त्वचा, श्वसनमार्ग संस्था, मेंदु, जठर यावर विपरीत परीणाम होतो. त्यांची मानसिक, शारीरीक व बौद्धीक वाढ खुंटते. चांगले जीवन जगण्याचा त्यांना अधिकार आहे, तो आपण सर्वांच्या प्रयत्नाने व मदतीने त्यांना मिळाला पाहिजे. या निमित्ताने बालमजुरी मुक्त महाराष्ट्र या मोहिमेमध्ये सुध्दा जागरुक नागरीक म्हणून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा.रा. काळे यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद