नँनो खतांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि.20 (जिमाका) : कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी तीन वर्षाकरीता विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना नँनो खतांचा पुरवठा केला जाणार असून त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी ही योजना राबविली जात आहे. योजनेंतर्गत चालू खरिप हंगाम मध्ये नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस या निविष्ठा पुरविण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचा कालावधी दि. १२ ते ३० जून आहे. मेटाल्डीहाइड सोयाबीनचा अर्ज करण्याचा कालावधी दि.१२ ते २३ जून आहे.
या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि.१२ जून पासून सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
000
Comments
Post a Comment