बेंबळा प्रकल्पातून रब्बीसाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित > वेळापत्रक जाहीर
बेंबळा प्रकल्पातून रब्बीसाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित > वेळापत्रक जाहीर यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावरील बाभूळगाव, कळंब, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील लाभक्षेत्रासाठी रब्बी हंगाम 2025-26 साठी सिंचन पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. > वेळापत्रक : पहिले आवर्तन 28 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान असून, त्यानंतर 12 ते 23 डिसेंबरदरम्यान कालवा बंद असेल. दुसरे आवर्तन 24 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारी 2026 या कालावधीत असेल. त्यानंतर दि. 7 जानेवारी 2026 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान कालवा बंद असेल. तिसरी पाणीपाळी 19 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान असून, दि. 2 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कालवा बंद राहील. चौथे आवर्तन दि. 14 ते 27 फेब्रुवारीदरम्यान असून, दि. 28 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान कालवा बंद राहील. पाचवी पाळीपाळी 12 ते 25 मार्च 2026 दरम्यान असेल. दि. 26 मार्च 2026 पासून कालवा पूर्णपणे बंद करण्यात येईल. रब्बी हंगामासाठी पाणी घेण्याकरीता शेतकऱ्यांनी नमुना 7. 7 अ आणि 7 ब मधील अर्ज प्रभागानुसार संबंधित बेंबळा पाटबंधारे उपविभागांच्या क...