एमआयडीसीमध्ये सेंट्रल बँकेतर्फे एमएसएमई कर्ज उपलब्धता शिबिर

एमआयडीसीमध्ये सेंट्रल बँकेतर्फे एमएसएमई कर्ज उपलब्धता शिबिर यवतमाळ, दि. 19 (जिमाका) : स्थानिक उद्योजक, सूक्ष्म-लघु उद्योग व्यावसायिक व नवउद्योजकांना व्यवसायवाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन व अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अमरावती क्षेत्रीय कार्यालय आणि एमआयडीसी यवतमाळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एमएसएमई कर्ज उपलब्धता शिबिर दि. २१ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता एमआयडीसीतील सी-झोनमधील शाकंबरी जिनिंग कंपनीच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमात बँकेचे वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. एमएसएमईचे कर्ज सुविधा व पात्रता, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,मुद्रा व इतर सरकारी योजना, डिजिटल पेमेंट व उद्यम नोंदणी प्रक्रिया, महिला उद्यमी साठी विशेष योजना, उद्योग वाढीसाठी वित्तीय साक्षरता आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बँक अधिकाऱ्यांकडून ऑन-द-स्पॉट कर्ज मार्गदर्शन व कागदपत्रांसंबंधी सहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून उपस्थिती नोंदणी आवश्यक आहे. स्थानिक उद्योजक, व्यवसायिक आणि स्टार्ट-अप्सनी या संधीचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी नजीकच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे यानी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस