तूर पिकावरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापन
तूर पिकावरील शेंगा पोखरणा-या अळयांचे व्यवस्थापन
सध्या तूर हे पिक फुलावर येण्याच्या स्थितीत आहे मागील काही आठवडयातील असणारे सतत चे ढगाळ वातावरण व रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळयापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय योजना करणे आवशक आहे. शेंगा पोसारणा-या अळयांमधे खालील प्रकारच्या अळयांचा समावेश होतो.
१. शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्षा): या किडीची मादी पतंग तुरीच्या कळया, फुले व शेंगा, यावर अंडी घालते. अंडयातून निघालेल्या अळया तूरीच्या कळया आणि फुले खाऊन गुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब, विविध रंग छटेत दिसुन येते असे पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून तीच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळया शेंगांना सिद्ध करून आतील दाणे पोखरून खातात.
२. पिसारी पतंग : या पतंगाची अळी १२.५ मि.मि. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते.
३. शेंगे माशी:- या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढ-या रंगाची असून तिला पाय बसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगा पोखरणारी अळीचे नुकसान शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.
एकात्मिक व्यवस्थापन
या तिनही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. १. प्रति हेक्टर २० पक्षीयांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळया खाऊन फस्त करतात. तसेच घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत.
२ . आर्थिक नुकसान संकेत पातळी :
§ घाटे अळी ५-६ पतंग प्रती सापळा २-३ दिवसात किंवा १ अळी प्रती झाड किंवा ५-१० पिसारी पतंग टक्के नुकसान.
§ पिसारी पतंग ५ अळया /१० झाडे अशी आर्थिक नुकसान धोक्यावी पातळी गाठताच खालील उपाययोजना कराव्या.
§ शेंगे माशी ५ ते १० टक्के बुकसान ग्रस्त दाणे.
३. पहिली फवारणी (५० टक्के फुलोरावर असतांना).
निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम १००० मिली प्रति एकर किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम ५०० मिली प्रति एकर किंवा एच.ए.एन.पि.व्हि (१०१०० पिओबी/मिली) २०० एल.ई. प्रति एकर. किंवा बॉसिलस थुरिंनजिएंसिस ३०० मिली प्रति एकर किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी., ४०० मि.ली. प्रति एकर या प्रमाणे कोणत्याही एका किटकनाशकांची पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४. दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसानी)
इमामेक्टीन बेझोएट ५ एस जी ६० ग्रॅम प्रति एकर किंवा लॅब्डा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी २०० मिली प्रति एकर किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी १०० मिली प्रति एकर किंवा क्लोरेंनट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. प्रवाही ६० मिली प्रति एकर याप्रमाणे कोणत्याही एका किटकनाशकांची पाण्यात मिसळून फवारणी करावी.
`(संतोष डाबरे)
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
यवतमाळ
Comments
Post a Comment