इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी इस्रायल येथे परदेशात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या मोठी भरती जाहीर झाली आहे. इस्रायलमधील विविध कौशल्याधारित कामांसाठी मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे उपलब्ध असून, जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे. या भरतीमध्ये खालील पदांवर मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात येणार आहे.प्लॅस्टरिंग वर्क 1 हजार पदे सिरेमिक टायलिंग 1 हजार पदे ड्रायवॉल वर्कर 300 पदे मेसन गवंडी) 300 पदे,निवड झालेल्या उमेदवारांना अंदाजे मासिक वेतन 1 लक्ष 62 हजार इतके मिळणार आहे. उमेदवार भारतीय नागरिक असावा. किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक.संबंधित क्षेत्रात किमान ३ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २५ ते ५० वर्षे इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक किमान ३ वर्षे वैधता असलेला पासपोर्ट आवश्यक उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. उमेदवाराने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/1yl- 7iJQeMk1bZYbMrLt1eyBRLQ 8TBcYEGRXcEJIVPI/edit या Google Form लिंकवर जाऊन आवश्यक माहिती भरून आपली नोंदणी करावी तसेच अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी कळविले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस