कपाशीवरील रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे करा व्यवस्थापन

कपाशीवरील रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे करा व्यवस्थापन किटकशास्त्र विभागाच्या चमूने दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रक्षेत्रावर पाहणी केली असता कपाशीवर रसशोषक किडी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीचे एकीकृत व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते . त्यासाठी खालील उपाययोजना अवलंब करावा . एकीकृत व्यवस्थापनः रस शोषक कीडीचे व्यवस्थापन § रंस शोषक कीडींसाठी कपाशीचे पिकाचे प्रादुर्भावबाबत सर्वेक्षण करावे. § पिकामध्ये पिवळे चिकट सापळे लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे (२५/हे.) § वेळेवर आंतर मशागत करून पीक तण विरहीत ठेवावे त्यामुळे किडीच्या पर्यायी खाद्य ताणाचा नाश होईल. तसेच बांधावरील किडीच्या पर्यायी खाद्य ताणे जसे अंबाडी ई नष्ट करावी. § मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा जेणेकरून कपाशीची अनावश्यक काचीकड होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किहही कमी प्रमाणात राहील. § रस शोषक किडीवर उपनिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफीड माशी, कालीन, ढालकिडे, क्रायसोपा, अॅनॅलिसिस प्रणालीचा परोपजीवी किटक ई संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा. § सठसरी संख्या १० मावा /पान किंवा २ ते ३ तुडतुडे /पान किंवा दहा फूलकीड/पान किंवा मावा तुडतुडे, फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेजीन २५ टक्के प्रवाही २० मि. ली., किंवा फिप्रोनिल १५ टक्के प्रवाही ३० मि.ली., किंवा इमिडाक्लोपिड १७.८ टक्के २.५ मि.ली. यापैकी कोणतेही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन § प्रत्येक गावात, कापूस संकलन केंद्रे व जीनींग फैक्टरीमधे १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवडयाने पतंगाचा नायनाट करावा. § दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझेडिटेक्टिन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० ली पाणी या प्रमाने फवारणी करावी . § फेरोमोन सापळ्याचा वापर करावा, पिकाच्या वाढीव अवस्येच्या उंचीनुसार किमान एक फुट अंतर ठेवावे जेणेकरून फेरोमोन सापळवाव्या प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल, यालाही एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापले लावावेत. § पिकवतील होमकळया नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिक्यांची रोकयाम करता येईल § पिक उगवनी नंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टाँगडीयाक्ट्री किया ट्रायकोग्रामा चिलोमिटर परोपजीवी भित्र किटकावी १.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी चार वेळा सोडावे. § गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापन साठी प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनीधीला करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पाल्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पाल्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ ते १० टक्के आढळल्यास खालील प्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन फुलामधे प्रादुर्भाव ५ टक्के पर्यंत आढळून आल्यास * क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली किंवा * क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली किंवा * प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मिली किंवा * इंडोक्साकार्ब १५.८ टक्के १० मिली किंवा * डेल्टामेथ्रीन २.८ टक्के १० मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव १० टक्केच्यावर असल्यास + क्लोरेंट्रानिलीप्रोल ९.३ टक्के लॅब्डासायहॅलोथ्रीन ४.६ टक्के ५ मिली किंवा * क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ टक्के २० मिली किंवा * इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के + अॅसीटामिप्रीड ७.७ टक्के १० मिली. या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीवरील रस शोषक किडी व बोंड अळयाचे एकत्रित व्यवस्थापन v अॅसीटामिप्रीड २५%+ बायफेनथ्रीन २५% डब्लुजी ३ ग्रॅम किंवा v अॅसीफेट ५०% + इमिडाक्लोप्रीड १.८०% एसपी २० ग्रॅम किंवा v क्लोरपायरीफॉस ५० टक्के सायपरमेथ्रीन ५. टक्के २० मिली किंवा v इमामेक्टीन बेन्झोएट १.१% + डायफेनधायुरॉन ३०% एससी २० मिली वरील पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी . `(संतोष डाबरे) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यवतमाळ

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस