यवतमाळमध्ये 4 जानेवारीला ‘हेल्थ मॅरेथॉन’
नववर्षाच्या प्रारंभी आरोग्यदायी उपक्रम
यवतमाळमध्ये 4 जानेवारीला ‘हेल्थ मॅरेथॉन’
अधिकाधिक यवतमाळकरांनी सहभागी व्हावे
- जिल्हाधिकारी विकास मीना
यवतमाळ, दि. 27 : आरोग्यविषयक जनजागृती व फिटनेसला चालना देण्यासाठी ‘यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन’चे आयोजन दि. 4 जानेवारी 2026 रोजी करण्यात येत आहे. हा उपक्रम समृद्ध व निरामय आरोग्याची जाणीव निर्माण करणारा असून, अधिकाधिक यवतमाळकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
कॉटन सिटी रनर्सतर्फे जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा पोलीस दल तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने नेहरू क्रीडांगण (गोधणी रस्ता, यवतमाळ) येथून यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून, सर्व विभाग, अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. हा उपक्रम 21 कि. मी. हाफ मॅरेथॉन, 10 कि. मी. पॉवर रन, 5 कि. मी. फिटनेस रन, 5 कि. मी. बाल रन, 3 कि. मी. कौटुंबिक, फन रन या प्रकारात होईल. नोंदणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे.
आरोग्यविषयक जनजागृतीसाठी ही मॅरेथॉन चौथ्या वेळा आयोजित केली जात असून, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनचे अध्यक्ष डॉ. परेश गडेचा व सचिव डॉ. शरद राखुंडे यांनी केले आहे.
नोंदणीसाठी उपलब्ध पर्याय
ऑनलाईन नोंदणी : https://shorturl.at/oEITO
ऑफलाईन नोंदणी : श्री. उमेश -९४२३६५४५१२, श्री. गोपाळ – ९७६७२७००८४, श्री. गणेश - ९८५०३१८०२१
०००
Comments
Post a Comment