
जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन यवतमाळ, दि. 27 : ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात मराठी भाषा गौरव दिन म्हणून आज साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, डॉ. नितीन व्यवहारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपेल्लीवार उपस्थित होते. श्री. खवले यांनी मराठी भाषेचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज्यात मराठी भाषा रूजावी, तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात अव्वल कारकुन भारती झाडे यांनी मराठी भाषेचे महत्व समजावून सांगितले. शालिनी बुटले यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाला जिल्हाधिकरी कार्यलयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000 आरटीई अंतर्गत प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ *2 मार्चपर्यंत करता येणार अर्ज यवतमाळ, दि. 27 : शिक्षणाचा हक्क अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के राखीव जागांवर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी 2 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात...