एका कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 38 नव्याने पॉझेटिव्ह


Ø 24 तासात 34 जण बरे

यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात 38 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये पुसद येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 34 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.30) एकूण 510 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 38 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 472 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 335 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12638 झाली आहे. 24 तासात 34 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11903 आहे. तर जिल्ह्यात एकूण 400 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 123502 नमुने पाठविले असून यापैकी 122762 प्राप्त तर 740 अप्राप्त आहेत. तसेच 110124 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी