जिल्ह्यात 49 जण कोरोनामुक्त ; 37 नव्याने पॉझेटिव्ह

 


Ø एकाचा मृत्यु

यवतमाळ, दि. 8 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 49 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 37 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तसेच जिल्ह्यात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यु झाला आहे. मृतकामध्ये नेर येथील 55 वर्षीय महिला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 428 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 37 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 391 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 300 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11786 झाली आहे. 24 तासात 49 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11109 आहे. तर जिल्ह्यात एकूण 377 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 115219 नमुने पाठविले असून यापैकी 114636 प्राप्त तर 583 अप्राप्त आहेत. तसेच 102850 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल