जिल्ह्यात 76 जण कोरोनामुक्त ; 25 नव्याने पॉझेटिव्ह

 


यवतमाळ, दि. 3 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 76 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. गत 24 तासात जिल्ह्यात 25 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 349 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 25 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 324 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 418ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11631 झाली आहे. 24 तासात 76 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10839 आहे. तर जिल्ह्यात एकूण 374मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 112851 नमुने पाठविले असून यापैकी 112319 प्राप्त तर 532 अप्राप्त आहेत. तसेच 100688 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००

 

 

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती