नगरपंचायतींच्या अंतिम प्रभाग रचनेची अधिसुचना पाहण्यासाठी उपलब्ध


यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यातील मारेगाव, कळंब, झरी, महागाव, बाभुळगाव आणि राळेगाव या नगर पंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरीता 10 नोव्हेंबर 2020 रोजी सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये दिलेल्या सुचनेनुसार या नगरपंचायतींची प्रारुप प्रभाग रचना 18 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार मतदारांकडून हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या.

सदर आक्षेपांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे अभिप्राय सादर करण्यात आले होते. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासनाने मारेगाव, कळंब, झरी, महागाव, बाभुळगाव आणि राळेगाव या नगर पंचायतीच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली. त्यानुसार संबंधित नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संबंधित शहराची विभागणी नवीन प्रभागामध्ये केली असून त्यांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सीमा प्रदर्शित केलेल्या अंतिम प्रभाग रचनेची अधिसुचना मारेगाव, कळंब, झरी, महागाव, बाभुळगाव आणि राळेगाव या नगर पंचायतीच्या कार्यालयाच्या तसेच जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या कार्यालयातील सुचना फलकावर आणि yavatmal.nic.in या संकेतस्थळावर 30 ‍डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.

त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मारेगाव, कळंब, झरी, महागाव, बाभुळगाव आणि राळेगाव येथील नगर पंचायत येथे सदर अधिसुचना नागरिकांना कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी