कोरोनाबाधित दोघांचा मृत्यु ; 43 नव्याने पॉझेटिव्ह

 


v 35 जण कोरोनामुक्त

यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यात गत 24  तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 43 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 35 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

मृतकांमध्ये वणी तालुक्यातील 68 वर्षीय महिला आणि आर्णि तालुक्यातील 21 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 292 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 43 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 249 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 301 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12012 झाली आहे. 24 तासात 35 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11329 आहे. तर जिल्ह्यात एकूण 382 मृत्युची नोंद आहे. 

सुरवातीपासून आतापर्यंत 117439 नमुने पाठविले असून यापैकी 116833 प्राप्त तर 606 अप्राप्त आहेत. तसेच 104821 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल