अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जिल्ह्यात 4 वाजेपर्यंत 70.33 टक्के मतदान

 


यवतमाळ, दि. 1 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता यवतमाळ जिल्ह्यात सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकूण 70.33 टक्के मतदान झाले. यात 70.40 टक्के पुरुषांनी तर 70.11 टक्के महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यात एकूण 5649 पुरुष मतदार तर 1810 महिला मतदार असे एकूण 7459 मतदार आहेत.  तसेच जिल्ह्यात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 42 आहे. यात 32 पुरुष मतदार आणि 10 महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 3977 पुरुषांनी आणि 1269 महिला मतदारांनी निवडणुकीचा हक्क बजावला. तर दिव्यांग मतदारांमध्ये 32 पुरुषांपैकी 27 आणि 10 महिलांपैकी 6 महिला मतदारांनी मतदान केले.

यवतमाळ जिल्ह्यातील 19 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून ही  निवडणूक होत आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तत्पूर्वी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बचत भवन येथील तसेच तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी