एमआयडीसीमध्ये सेंट्रल बँकेतर्फे एमएसएमई कर्ज उपलब्धता शिबिर यवतमाळ, दि. 19 (जिमाका) : स्थानिक उद्योजक, सूक्ष्म-लघु उद्योग व्यावसायिक व नवउद्योजकांना व्यवसायवाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन व अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अमरावती क्षेत्रीय कार्यालय आणि एमआयडीसी यवतमाळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एमएसएमई कर्ज उपलब्धता शिबिर दि. २१ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता एमआयडीसीतील सी-झोनमधील शाकंबरी जिनिंग कंपनीच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमात बँकेचे वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. एमएसएमईचे कर्ज सुविधा व पात्रता, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,मुद्रा व इतर सरकारी योजना, डिजिटल पेमेंट व उद्यम नोंदणी प्रक्रिया, महिला उद्यमी साठी विशेष योजना, उद्योग वाढीसाठी वित्तीय साक्षरता आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बँक अधिकाऱ्यांकडून ऑन-द-स्पॉट कर्ज मार्गदर्शन व कागदपत्रांसंबंधी सहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून उपस्थिती नोंदण...