अवैध दारु धंद्याविरोधात पोलिसांची ‘वॉश आऊट’ मोहीम

Ø जिल्हाभरात 37 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त Ø 563 आरोपींना अटक यवतमाळ, दि. 31 : जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध दारु धंद्याविरोधात पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविली. सदर मोहीम 19 जानेवारी ते 30 जानेवारी 2019 या कालावधीत राबविण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात 37 लक्ष 17 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात अवैध दारु व्यवसाय करणारे तसेच गावठी दारू निर्मिती करणा-या एकूण 563 जणांना अटक करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात एकूण 31 पोलिस स्टेशन आहेत. जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध दारू धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या नेतृत्वात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. यात स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथक तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश होता. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील संपूर्ण पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण 550 केसेस दाखल करण्यात आल्या. यात 563 ...