जिल्हाधिकारी कार्यालयात आपली पुंजी आपला अधिकार अंतर्गत कार्यशाळा संपन्न
यवतमाळ, दि. 31 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा अग्रणी बँक कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे ठेवीदार शिक्षण आणी जागरूकता निधी अर्थात डिफ अंतर्गत कॅम्प संपन्न झाला. बँकेत दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या दिशा निर्देशानुसार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 डिसेंबर रोजी डिफ कॅम्प जिल्हा स्तरावर प्रचार व प्रसिद्धी करीता घेण्यात आलेला होता. या कॅम्पमध्ये पात्र खातेधारकांनी सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या हक्काची रक्कम सहव्याज परत मिळविण्याची प्रक्रिया पार पाळली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी उपस्थित ग्राहकांना डिफ कॅम्पच्या संकल्पनेची माहिती दिली तसेच ग्राहकांना त्यांच्या हक्काची रक्कम परत मिळविण्यासाठी कॅम्पचा फायदा घेण्याचे आव्हान केले. या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजना बद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व बँकांचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच त...