वेध राष्ट्रीय जनगणनेचे : तयारीला गती अधिकारी- कर्मचा-यांना प्रशिक्षण
वेध राष्ट्रीय जनगणनेचे : तयारीला गती
अधिकारी- कर्मचा-यांना प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 24 (जिमाका): आगामी जनगणना २०२७ यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम झाला.
या प्रशिक्षणात जनगणना प्रक्रियेची उद्दिष्टे, कार्यपध्दती व प्रशासकीय समन्वय याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनिरूध्द बक्षी, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार तसेच सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
प्रशिक्षणात घरगणना व लोकसंख्या गणना, माहिती संकलनातील अचूकता, तंत्रज्ञानाचा वापर, माहितीची गोपनीयता, वेळापत्रकानुसार कामकाज, तसेच संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, आगामी काळात जनगणना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षण कार्यक्रमास सर्व तहसिल कार्यालये तसेच जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायती मधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मास्टर ट्रेनर सहायक संचालक प्रविण भगत आणि सांख्यिकी अन्वेषक अरूण साळगांवकर यांनी प्रशिक्षणाचे सादरीकरण केले.
000000
Comments
Post a Comment