मोटारसायकलसाठी क्रमांकांची नवीन मालिका सुरू आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे 'आरटीओं'चे आवाहन
यवतमाळ, दि. २ (जिमाका) : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन ४ या प्रणालीवर परिवहनेत्तर विभागातील सुरु असलेली मोटार सायकलची सिरीज एमएच २९ सीएन संपुष्टात येत असल्याकारणाने नविन मोटार सायकलची सरीज एमएच२९ सीपी दि.4 डिसेंबर पासून सुरु होत आहे. ज्या ग्राहकांना नविन आकर्षक नंबर घ्यावयाचा असेल त्यांनी कार्यालयात येऊन नविन आकर्षक क्रमांकांसाठी अर्ज सादर करावे. ही मुभा फक्त १ दिवसासाठी उपलब्ध राहील. त्यानंतर आपणास ऑनलाईन सुविधेचा उपयोग करता येईल याची ग्राहकांनी कृपया नोंद घावी. असे सह प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment