एकलव्य निवासी विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
एकलव्य निवासी विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
यवतमाळ, दि. 24 (जिमाका): इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य निवासी विद्यालयात प्रवेशासाठी आदिवासी विकास अप्पर आयुक्तांच्या अधिनस्त प्रकल्प कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा दि. 22 फेब्रुवारी 2026 होणार आहे.
त्याचप्रमाणे, पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ही प्रवेश परीक्षा दि. १ मार्च २०२६ रोजी घेण्यात येणार असून, शासकीय आश्रमशाळा शिबला ता. झरी, जि. यवतमाळ व शासकीय आश्रमशाळा अंतरगाव ता. कळंब, जि. यवतमाळ येथे होणार आहे. इयत्ता ६ वी साठी परीक्षा सकाळी ११ ते १ या वेळेत तर इयत्ता ७ वी ते ९ वी साठी सकाळी ११ ते 2 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
प्रवेश परीक्षेसाठीचे विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पांढरकवडा प्रकल्प कार्यालय, तसेच या कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांकडे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
शैक्षणिक सत्र २०२५–२६ मध्ये इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी व ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे पूर्ण भरलेले प्रवेश अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी दि. ४ फेब्रुवारीपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा येथे सादर करावेत, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी केले आहे
000000
Comments
Post a Comment