जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे संविधान दिन साजरा

यवतमाळ, दि. २ (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व राणी लक्ष्मीबाई विद्यालय, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने संविधान दिना निमित्य दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिपक एच दाभाडे, हे होते तर प्रमुख उपस्थीती म्हणून राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रफुल कुलकर्णी व पर्यवेक्षक देवेंद्र भिसे तसेच प्रमुख वक्ते म्हणुन अॅडव्होकेट जयसिंग चौहाण हे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रफुल कुलकर्णी यांनी केले. प्रमुख वक्ते अॅडव्होकेट जयसिंग चौहाण यांनी संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जात असल्याचे यावेळी सांगितले तसेच २९ ऑगष्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली त्यांच्या अनेक बैठका व चर्चासंत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो याबाबत विस्तृत माहिती दिली तसेच भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे व लिखित संविधान आहे. २६ नोव्हेंबर हा आपल्या लोकशाही इतिहासातील अत्यंत महत्वाचा टप्पा होता. भारतीय संविधानाची रचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यांनी व इतर सभासदांनी दिवस रात्र मेहनत घेवून प्रत्येक नागरीकांना समान हक्क, स्वांतत्र आणि न्याय मिळावा यासाठी उत्तम संविधान तयार केले त्यामुळेच त्याना संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे शेवटी अध्यक्ष दिपक एच. दाभाडे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन संविधानामुळे तळागळातील मुलामुलींना शिक्षणाची सोय कशी करण्यात आली याबाबत माहिती दिली तसेच शिक्षणाचे महत्व कळविले. संविधानाने आपल्याला मोफत शिक्षणाचा अधिकार तर दिलाच तसेच सांस्कृतिक, सामाजिक व शारिरीक उन्नती व्हावी याबाबत तरतुद सुध्दा असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक कौस्तुभ पाटबाजे यांनी केले तर आभारप्रदर्शन पर्यवेक्षक देवेंद्र भिसे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस