डॉ. मिर्झा यांना अभिवादनासाठी शनिवारी श्रद्धांजली सभा

यवतमाळ दि.१०: 'हास्य सम्राट ', 'मिर्झा एक्सप्रेस ' डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे 28 नोव्हेंबरला निधन झाले. शनिवार दिनांक १३ डिसेंबरला त्यांना अभिवादन करण्यासाठी श्री. फकीरजी महाराज संस्थान धनज माणिकवाडा येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजली सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे धनज माणिकवाडा हे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे पितृक गाव आहे.शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ही श्रद्धांजली सभा होणार आहे. डॉ.मिर्झा यांच्यावर प्रेम करणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व श्रोत्यांनी, रसिकांनी मोठ्या संख्येने या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गेल्या 50 वर्षांपासून विविध विचारपीठांवरून ,कवी संमेलनातून, तीन पिढ्यांचे मनोरंजन व प्रबोधन करणारे डॉ. मिर्झा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी 28 नोव्हेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. विदर्भ, मराठवाडा व महाराष्ट्रातील त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांच्या प्रति आपल्या संवेदना व्यक्त करता याव्यात यासाठी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या मित्र मंडळांनी हे आयोजन केले आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे, काव्य श्रद्धांजली व्यक्त करणे, कुटुंबाच्या सदस्यांची भेट घेणे व मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करणे, असे या श्रद्धांजली सभेचे स्वरूप आहे. रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ.मिर्झा रफी अहमद बेग मित्र मंडळाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस