जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडून मतदान केंद्रांना भेट

यवतमाळ, दि. २ डिसेंबर (जिमाका) : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध निवडणूक क्षेत्रांतील मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचा पडताळा घेतला. जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी नेर येथील तहसील कार्यालय येथील स्ट्रॉंग रूमला भेट दिली. मतदान साहित्य वाटप, साहित्य घेणे या व्यवस्थेची पाहणी केली. कंट्रोल रूमला भेट दिली व मतमोजणी व्यवस्थेबाबतची माहिती करून घेतली. नेर येथील श्री शिवाजी विद्यालय येथील बूथ क्रमांक 1/1, 1/2, 1/3 ला भेट देऊन त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच दारव्हा येथील मनोहर नाईक विद्यालय येथील प्रभाग क्रमांक 9 येथील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. व दिग्रस येथील मोहनाबाई कन्या शाळा येथील पिंक मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे, त्यांनी पुसद येथे नगरपरिषद केंद्र क्र.2/2, प्रभाग क्र.2 तसेच पीएमश्री स्व.विठ्ठलराव हैबती चव्हाण न.प.म.उ.प्राथमिक शाळा क्र.8 इटावा बुथचीही पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध केलेल्या सोयी, ईव्हीएम मशीनची स्थिती, क्यू व्यवस्थापन तसेच मतदान कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदान प्रक्रियेबाबत माहिती घेतली. मतदान केंद्रावर सुरळीत व शांततेत मतदान पार पडत असून, कर्मचा-यांनी सजग राहून आयोगाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी तहसील प्रशासनाचे अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस