शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध

यवतमाळ, दि. 17 (जिमाका): श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, यवतमाळ येथे नागरिकांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा कार्यान्वित आहेत. रुग्णालयात कार्डीओलॉजी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, इकोकार्डीओग्राफी,न्युरोसर्जरी,मेंदूच्या शस्त्रक्रिया,हेड इन्ज्युरी, युरोसर्जरी,मुत्रविकार,मुतखडा इ.शस्त्रक्रिया, कॅन्सर किमोथेरपी, तसेच सी.टी. स्कॅन व एम.आर.आय. तपासणी सुविधा उपलब्ध आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. नागरिकांनी या शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. वसंतराव नाईक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अरुण ऊईके, यांनी केले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस